विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभर चीनी व्हायरस कोरोनाचा फैलाव करणाऱ्या तबलिगी जमातीचा म्होरक्या मौलाना महंमद साद हा झाकीर नगरमधील घरातच लपून बसलेला सापडला.
दिल्ली पोलिस आता प्रथम त्याची कोरोना चाचणी करतील आणि त्याला घरातच क्वारंटाइन करायचे की हॉस्पिटलमध्ये हलवायचे याचा निर्णय घेतील. पण त्याची विडिओ कॉलद्वारे पोलिस चौकशी करतील. लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम तोडून निजामुद्दीनच्या मरकजमध्ये मौलानाने धार्मिक कार्यक्रम घेतले. त्याबद्दल मौलाना आणि त्याच्या ६ साथीदारांवर पोलिसांनी कलम ५०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तो फरार झाल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. मौलाना सादला पोलिसांनी २६ प्रश्नांची प्रश्नावली पाठविली होती. त्याला उत्तर देताना मौलाना सादने आपण होम क्वारंटाइन असल्याचे म्हटले होते.
आता मौलाना सादचा पत्ता लागल्याने त्याच्यासह सर्वांची कायद्यानुसार तपास आणि चौकशी होईल, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले. मौलाना सादचा मुलगा मौलाना युसूफ याने विडिओद्वारे प्रवचन करून मकरजच्या मशिदीत नमाज पठणासाठी जमण्याचे आवाहन केले होते. त्याचीही चौकशी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.