अमेरिकेसारख्या महासत्तेचे प्रमुख डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोना व्हायरसविरुध्द गुडघे टेकले असताना भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असलेल्या निर्णयांचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. जागतिक बँकेने यापुढे जाऊन कोरोना व्हायरसविरुध्द लढ्यात मोदींना आर्थिक बळ देण्यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा आपत्कालिन निधी देण्यास मान्यता दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : अमेरिकेसारख्या महासत्तेचे प्रमुख डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोना व्हायरसविरुध्द गुडघे टेकले असताना भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असलेल्या निर्णयांचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. जागतिक बॅँकेने यापुढे जाऊन कोरोना व्हायरसविरुध्द लढ्यात मोदींना आर्थिक बळ देण्यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा आपत्कालिन निधी देण्यास मान्यता दिली आहे.
अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कसारख्या शहरात कोरोनाचा हाहा: कार उडाल असताना ट्रंप यांना लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेता आला नाही. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला यामुळे फटका बसेल असे त्यांनी म्हटले होते. मात्र, मोदींनी देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
सामान्यांना त्याचा फटका बसू नये यासाठी उपाययोजनाही केल्या. दहा दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असून त्यामुळे कोरोनाचा उद्रेक रोखण्यात मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. मोदी सरकारने हा दूरदृष्टीनो घेतलेला अत्यंत धाडसी निर्णय आहे अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हीड नाबारो यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याच्या भारताच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. हा दूरदृष्टीने सरकारने घेतलेला अत्यंत धाडसी निर्णय आहे अशा शब्दात डेव्हीड नाबारो यांनी कौतुक केले आहे. रुग्णांची संख्या कमी असतानाच खूप लवकर लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संपूर्ण देशाला आपल्या शत्रूची कल्पना आली.
व्हायरसच्या संक्रमणाची साखळी मोडण्यासाठी तयारी करण्यासाठी स्थानिक पातळीवर वेळ मिळाला, असे डेव्हीड म्हणाले. लॉकडाउनच्या निर्णयावर वादविवाद, टीका होणार हे टाळता येणार नाही. रोजचे दैनंदिन जगणे विस्कळीत झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजी, अस्वस्थततेची भावना सहाजिक आहे. पण सरकारने घेतलेला हा धाडसी निर्णय आहे असे म्हणत भारतात मोदींच्या निर्णयाला विरोध करणार्यांनाही नाबारो यांनी फटकारले आहे. या निर्णयामुळे रोजंदारीवर काम करणार्या गरीबांचे मोठे नुकसान झाले असून एकप्रकारे त्यांनी बलिदानच दिले आहे, अशा शब्दांत नाबारो यांनी कौतुक केले.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील प्रयत्नांचे कौतुक केल्यावर जागतिक बॅँकेनेही या लढ्यात साथ दिली आहे. जागतिक बँकेने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. यासाठी जागतिक बँकेने पुढाकार घेतला असून बँकेने भारताला आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. कोरोनाविरुध्द लढण्यासाठी भारताला सात हजार ५०० कोटींचा (१०० कोटी डॉलर) आप्तकालीन निधी देण्यास मंजूरी दिली आहे.
जागतिक बँकेकडून मदतनिधी म्हणून देण्यात येणार्या निधीपैकी पहिला टप्पा म्हणजे १.९ अरब डॉलरचा निधी देण्यास सुरुवात झाली आहे. हा निधी २५ देशांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या निधीपैकी सर्वाधिक निधी भारताला देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी भारत सरकारला तात्काळ उपाययोजना करता येतील. यामध्ये स्थानिक स्तरावर करोनाचा संसगार्ला आळा घालणे आणि इतर महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात महत्वाचे निर्णय घेता येतील. त्याचबरोबर देशातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करुन कोरोनाशी सामना करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने सरकारला तयार राहता येईल. व्यक्तीमधून व्यक्तींना होणार संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना सरकारला करता येतील.
या निधीमधून करोनासंदभार्तील स्क्रीनिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (म्हणजे संर्सग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना शोधणे), प्रयोगशाळा उभारणे यासारखी कामे केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे मास्क आणि इतर आरोग्य विषयक गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.