• Download App
    मोदींच्या आत्मनिर्भर भारत मिशनसाठी 100 लाख कोटींचे इन्फ्रास्ट्रक्रचर, नितीन गडकरी यांची माहिती | The Focus India

    मोदींच्या आत्मनिर्भर भारत मिशनसाठी 100 लाख कोटींचे इन्फ्रास्ट्रक्रचर, नितीन गडकरी यांची माहिती

    आत्मनिर्भर भारत हे मोदींचे मिशन आहे. आम्ही १०० लाख कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे ठरवले आहे. इंधनाला पर्याय ठरणाऱ्या इथेनॉल, बायोफ्युल, बायोसीएनजीवर काम करत आहोत. क्रूड ऑईलची आयात नक्कीच कमी करु, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत हे मोदींचे मिशन आहे. आम्ही १०० लाख कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे ठरवले आहे. इंधनाला पर्याय ठरणाऱ्या इथेनॉल, बायोफ्युल, बायोसीएनजीवर काम करत आहोत. क्रूड ऑईलची आयात नक्कीच कमी करु, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

    एका वेबिनारमध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, आत्मनिर्भर भारतामध्ये एमएसएमईचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. आयात कमी करुन, निर्यात वाढवणे. त्यासाठी तंत्रज्ञानात सुधारणा आवश्यक आहेत. उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्ये सुधारणा करुन चांगल्या पद्धतीने ते उत्पादन सादर करणे एमएसएमईसाठी महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रॉनिक सॉफ्टेवेअर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीवर जोर दिला आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडियाला प्राधान्य आहे.

    ज्ञान आणि वेस्ट या दोन गोष्टींना संपत्ती निर्मितीमध्ये बदलणे आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक आहेत असे सांगून गडकरी म्हणाले की, जीडीपी, निर्यात वाढली पाहिजे, आयात कमी झाली पाहिजे, ते मोदींचे मिशन आहे. आम्ही त्यावर मेहनत घेतोय. ऑटोमोबाइल आणि अन्य सेक्टर्सच्या अडचणीवर तोडगा काढलाय. प्रत्येक देशाची धोरणे असतात.

    एमएसएमई सेक्टर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये एमएसएमईचा ३० टक्के वाटा आहे. ४८ टक्के निर्यात एमएसएमईमधून होते. या क्षेत्राने ११ कोटी नोकऱ्या तयार केल्या आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे क्षेत्र आहे.

    Related posts

    महिला IPS अधिकाऱ्याला दमबाजी केल्यानंतर स्वतः अजितदादा आणि त्यांचे आमदार मिटकरी नरमले कसे??; कुणी नरमवले??

    Donald Trump भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सौम्य सूर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण…

    Howard Lutnick अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा दावा केला!!