चीनी व्हायरससारख्या भयानक संकटाच्या काळातही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी बनावट बेवसाईट तयार करून त्याद्वारे फसवणुकीचे राज्यात ७८ गुन्हे दाखल झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनी व्हायरससारख्या भयानक संकटाच्या काळातही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी बनावट बेवसाईट तयार करून त्याद्वारे फसवणुकीचे राज्यात ७८ गुन्हे दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र सायबर सेलने लोकांना सोशल मीडियावर पसरल्या जाणार्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईसाठी मदत करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, काही जणांनी बनावट वेबसाईट करण्याचा खोडसाळपणा केला आहे. नागिरकांनी अशा खोट्या लिंकचा अजिबात वापर करू नये, असे आवाहनही सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमालावली प्रसारित करत असतात. त्यानुसारच मदत द्यावी असे पोलीसांनी म्हटले आहे.
pmcarefund@sbi, pm.care@sbi, pmcare@sbi, pncare@sbi ,pncares@sbi pmcares@pnb, pmcares@upi, pmcaress@sbi, pmcares@hdfc अशा प्रकारच्या वेबसाईटवरून आपल्याला संपर्क होईल. त्यावर कोणत्याही प्रकारची मदत देऊ नये. कोणत्याही वेबसाईटची सत्यता पडताळल्याशिवाय आॅनलाईन देणगी देऊ नये, असे आवाहनही पोलीसांनी केले आहे.