विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पालघर मॉब लिंचिग प्रकरणात थेट प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार अर्णव गोस्वामीची मुंबई पोलिस सलग सात तास चौकशी करत आहेत.
अर्णव सकाळी ९.३० वाजता ना. म. जोशी मार्गावरील पोलिस ठाण्यात पोहोचला. तेव्हापासून पोलिस चौकशी सुरूच आहे, असे ट्विट एएनआय वृत्तसंस्थेच्या संपादिका स्मिता प्रकाश यांनी केले आहे.
दरम्यानच्या काळात अर्णव काही मिनिटांसाठी बाहेर आला पण त्याने आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला नाही, असे रिपब्लिक नेटवर्कने म्हटले आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या तक्रारीवरून सध्या अर्णवची चौकशी सुरू आहे.
अर्णव विरोधात ठिकठिकाणी २१ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर अर्णवविरोधात एकच एफआयआर दाखल करून चौकशी करता येईल, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले होते.
मुंबई पोलिसांनी काल १२ तासांच्या कालावधीत अर्णवला चौकशीसाठी दोन नोटिसा पाठविल्या होत्या. अर्णवने आपण चौकशीसाठी सहकार्य करू अशी भूमिका जाहीर केल्यानंतरही या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.