विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातला तथाकथित लिबरल मीडिया किती उथळ आणि पक्षपाती आहे, याचा बुरखाच एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने उतरविला.
हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या रियाज नायकूचा भारतीय सैन्याने खात्मा केला. त्यानंतर लगेच ब्रेकिंग न्यूज दाखवत मीडियाने त्याचा सगळा इतिहास, भूगोल सांगितला. आपल्या लायब्ररीतून रियाज नाईकूचे खासगी जीवन, खान पान, आवडी निवडी, कुटुंब या सगळ्याची माहिती तपशीलवार सांगितली. रियाज नाईकू कोण होता हे उभा आडव्या भारताला सांगितले.
… पण परवात हंदवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या आपल्या मेजरसह चार जवान शहीद झाले. पण मीडियाला यातल्या तीन जवानांची नावे देखील माहिती नव्हती की त्यांची अन्य माहितीही ठावूक नव्हती. अनेक वाहिन्यांवर नावे चुकीची सांगितली गेली.
निवृत्त मेजर नील यांनी याबद्दल खंत व्यक्त करीत ट्विटरवर मीडियाची ही विसंगती मांडली आहे.