- मालेगावात करोना पॉझिटिव्ह रूग्णांनी संख्या ११० तर नाशिक जिल्ह्यात १२४ रूग्ण
विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मालेगाव शहरात करोनाचे थैमान सुरू असून आताच मिळालेल्या माहितीनुसार आणखी ९ करोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मालेगाव शहरातील रुग्णांनी आज सकाळी शंभरी गाठली होती.
आज सकाळी एकूण ५ रुग्ण करोना बाधित आढळून आल्याने ही संख्या १०१ पोहचली होती. आता त्यात ९ रूग्णांची भर पडली असून हा आकडा आता ११० वर पोहचला आहे. यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण मालेगाव शहरात आहे.
येथील करोना बाधितांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना करत असली तरी अजूनपर्यंत या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. नाशिक जिल्ह्यातील आकडा आता १२४ वर गेला असून यात नाशिक शहरातील १० तर इतर तालुक्यातील ४ करोनाबाधित रूग्ण आहे.