• Download App
    मालेगावात ६ कोरोनाग्रस्त; एकाचा मृत्यू; ५ जणांवर उपचार सुरू | The Focus India

    मालेगावात ६ कोरोनाग्रस्त; एकाचा मृत्यू; ५ जणांवर उपचार सुरू

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील 51 वर्षीय कोरोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यासह सहाजणांचे घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, अहवाल येण्याआधीच एकाचा बुधवारी (दि.8) मृत्यू झाला. रात्री उशिरा मालेगावातील सहाजणांचे रिपोर्ट रुग्णालयास मिळाले आहेत. त्यातील पाचजण पॉझिटिव्ह असून मृत व्यक्तीचा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे.
    नाशिकमध्ये कोरोनाबाधित व संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. पाच मालेगांव, नाशिक शहर व लासलगावामधील प्रत्येकी एक आहे. मालेगावातील मृत व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी हज यात्रेला जावून आला होता. त्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावातील चार पॉझिटिव्ह रुग्णांवर सामान्य रुग्णालय मालेगाव येथील कोरोना विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

    Related posts

    भाजपचे काँग्रेसीकरण; नवे प्रयोग करतानाही शिस्तीला ग्रहण!!

    वंचितला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??

    मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!