शहरातून गेले दोन दिवस काही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याच्या बातम्या येत असताना आज कोरोना पॉझिटिव्ह संख्येत ३२ ने वाढ झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे. त्यामुळे आधीच रेडझोनमध्ये असलेल्या या भागात चिंता वाढली आहे.
विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मालेगाव शहरात करोना र बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शहराची परिस्थिती बिकट झाली आहे. आज सकाळी प्राप्त अहवालानुसार शहरातील ३२ रुग्ण बाधित आढळले आहे. यामुळे शहरातील रुग्णांची संख्या १५९ वर जाऊन पोहचली आहे. त्यात पहिल्या चार रुग्णांची करोना चाचणीचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात बाधित रुग्णांच्या संख्येत कुठलीही वाढ झाली नसल्याने व त्यातच ७ रुग्ण करोना मुक्त झाल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज सकाळी आलेल्या अहवालात एकदम ३२ बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णांची संख्या १६९ वर गेली आहे. या ३६ रुग्णांमध्ये यात २२ पुरुष तर १४ महिलांचा समावेश असून पुरुषांमध्ये एका ९ वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.