• Download App
    मालेगावात २४ तासात ७७ रुग्णांची वाढ ; एकूण रुग्ण ४९७ | The Focus India

    मालेगावात २४ तासात ७७ रुग्णांची वाढ ; एकूण रुग्ण ४९७

    विशेष प्रतिनिधी

    मालेगाव : शहरात करोना विषाणूने कहर केला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. काल दि.८ मे रोजी शहरात २८ तर दि.९ मे रोजी सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासात शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहचली आहे.

    मालेगाव शहरात ८ एप्रिलला पहिला रूग्ण सापडल्यानंतर शहराच्या रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ झाली. शहरात एका महिन्यातच रुग्णांचा आकडा ५०० च्या घरात जाऊन पोहचला आहे. काल दि.८ मे रोजी सकाळी २१, दुपारी १ तर सायंकाळी ६ याप्रमाणे एकूण २८ रुग्णांची वाढ झाली.

    यात २३ पुरुष तर ५ महिलांचा समावेश होता, महिला रुग्णांमध्ये एक दिड वर्षाच्या मुलीचा तर पुरुषांमध्ये २ पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. तर आज दि.९ मे रोजी आलेल्या अहवालात ४९ रुग्ण बाधित मिळून आले आहे. गेल्या २४ तासात मालेगावात ७७ रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्ण संख्या ४९७ इतकी झाली आहे. यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना स्वग्रही पाठविण्यात आले. मालेगाव शहरासह तालुक्यातील रुग्णांमध्ये देखील वाढ होत असून दाभाडी येथे ९, सवंदगाव १ तर चंदनपुरीत १ याप्रमाणे तालुक्यात एकूण ११ रुग्णांची वाढ झाली आहे.

    Related posts

    मनोज जरांगेंच्या तोंडी सरकार उलथवण्याची भाषा; ते विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार देणार होते त्याचे काय झाले??

    राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!

    बांगलादेशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच भारतात केली घुसखोरी; BSF ने केली अटक; सत्तेच्या उलथापालथीशी कनेक्शन!!