- मालेगाव शहरात आता एकूण १० करोना पॉझिटिव्ह
विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मालेगाव शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून काल गुरुवार रोजी ५ नवीन करोना पॉझीटीव्ह रुग्ण वाढले आहे. मालेगाव शहरात आता एकूण १० करोना पॉझीटीव्ह रुग्ण झाले असून यामुळे आता आरोग्य यंत्रणा हादरली आहे. नाशिक जिल्ह्यात आता करोना रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फ़े पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटवर्तीयांचा शोध घेतला जात आहे.
बुधवार रोजी मालेगाव शहरातील एकूण ५ करोना रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. यात एक रुग्ण दगावला होता. काल गुरूवार रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील एकूण ४ तर चांडवड येथील एका करोना बाधित रुग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने मालेगाव शहरातील करोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ९ इतकी झाली आहे. अजुन काही रुग्णांचा अहवाल प्रलंबित असल्याने शहरातील रुग्णांच्या संख्येत अजुन वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात सामान्य रुग्णालयातील मुख्य ३ डॉक्टर व २७ पारीचारकांचा देखील समावेश असल्याने शहरातील आरोग्य यंत्रणा देखील व्हेंटिलेटरवर असल्याने चिंतेत भर पडली आहे.
शहरात करोनाचा शिरकाव झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुरुवारी या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे व ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंग यांनी मालेगावी दौरा करीत शहरातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कठोर उपाययोजना करण्यात येत असून शहरातील चार परिसर पुढील १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. शहरात संचारबंदी असताना देखील काही उपद्रवी मूल्य याचे उल्लंघन करीत असल्याने प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. यात करोना संशयितांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे.