कोरोनाग्रस्तांच्या मालेगावच्या वाढत्या आकड्यामुळे नाशिक जिल्ह्याची रेडझोनमधून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुंबई पाठोपाठ पुणे आणि मालेगावचा आकडा वाढताना दिसतो आहे. खुद्द नाशिक शहर आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणांचा आकडा कमी आहे.
विशेष प्रतिनिधी
नाशिक : मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज प्राप्त अहवालानुसार शहरातील एक ६४ वर्षीय वृध्द करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आताच आलेल्या अहवालानुसार मालेगाव शहरातील एकूण ७ रुग्ण करोना बाधित आढळले असून मालेगाव शहराची रुग्ण संख्या ४७ वर गेली आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात करोना पाॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५ इतकी झाली आहे. आज नाशिक शहर सातपूर-अंबड लिंक रोडवरील ६३ वर्षांची वृद्ध महिला तर मालेगाव येथील ६४ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीस करोनाची लागण झाली आहे. यात नवीन ७ रुग्णांची भर पडली असून यात ५ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. या पुरुषांमध्ये १५ वर्षांची दोन मुले असून महिलांमध्ये एक १४ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मालेगाव शहरातील रुग्णांची संख्या ४७, नाशिक शहराची ५ तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील ३ याप्रमाणे जिल्ह्यातील पाॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५ इतकी झाली.