• Download App
    मायावतींचा काँग्रेसला सुनावले, रस्त्यावर गप्पा मारण्यापेक्षा मजुरांना अन्न-पाणी द्या | The Focus India

    मायावतींचा काँग्रेसला सुनावले, रस्त्यावर गप्पा मारण्यापेक्षा मजुरांना अन्न-पाणी द्या

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी स्थलांतरीत मजुरांशी गप्पा मारल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींनीही कॉंग्रेसला चांगलेच सुनावले आहे. राहूल गांधी यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या मजुरांशी गप्पा मारण्यापेक्षा त्यांना अन्न-पाणी दिले असते तर अधिक मदत झाली असती, असे त्यांनी म्हटले आहे.


    वृत्तसंस्था

    लखनऊ : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी स्थलांतरीत मजुरांशी गप्पा मारल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्य अध्यक्ष मायावतींनीही काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. राहूल गांधी यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या मजुरांशी गप्पा मारण्यापेक्षा त्यांना अन्न-पाणी दिले असते तर अधिक मदत झाली असती, असे त्यांनी म्हटले आहे.

    राहूल गांधी यांनी मजुरांशी संवाद साधल्यानंतर मायावती म्हणाल्या स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर कॉँग्रेसनेही धडा घेण्याची गरज आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये स्थलांतरीत मजुरांची भेट घेतली. या वेळी कॉँग्रेसने त्यांना काही आर्थिक मदत दिली असतील किंवा जेवणाची व्यवस्था केली असती तर अधिक चांगले झाले असते.

    पंजाब आणि चंडीगढच्या घटनांचा अहवाल देऊन मायावती म्हणाल्या, या राज्यांतील उत्तर प्रदेशांतील मजुरांकडे अक्षम्य दूर्लक्ष झाले आहे. अनेक मजुरांना तर यमुना नदीच्या मार्गाने घरी परतावे लागत आहे. त्यांच्याबाबतीत कोणतीही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे कॉंग्रेस आपल्या ज्या बस उत्तर प्रदेशच्या सीमेवर ठेवल्या आहेत,असे म्हणते त्या पंजाब आणि चंडीगढला पाठवायला पाहिजेत. त्यामुळे यमुना नदीच्या काठाने येणाऱ्या श्रमिकांना आपले जीव धोक्यात घालावे लागणार नाही. ते सुरक्षित उत्तर प्रदेशात पोहोचू शकतील.

    बहुजन समाज पक्ष स्थलांतरीत मजुरांबाबत केवळ कोरडी सहानुभूती दाखवित नाही; तर मदतही करत आहे. कॉँग्रेसनेही याचा आदर्श घ्यायला हवा. मजुरांचे सुख-दु:ख वाटून घ्यायला हवेत

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    बाळ ते बाळासाहेब; मीरा भाईंदरच्या नव्या कलादालनातून उलगडला भव्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास!!