विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माझी तब्येत उत्तम आहे. मी काम करतोय. माझ्या तब्येतीविषयी अफवा फैलावणाऱ्यांनीही त्यांचे काम करत राहावे, असे ट्विट करून गृहमंत्री अमित शहा यांनी आज या विषयाला पूर्णविराम दिला.
अमित शहा यांना गंभीर आजार झाल्याच्या अफवा गेले काही दिवस सोशल मीडियावरून परसविल्या जात होत्या. यावर अमित शहा यांनी ट्विट करून आज खुलासा केला. यात ते म्हणतात, “कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मी गृहमंत्री या नात्याने सतत कार्यरत आहे. माझ्या तब्येती विषयीच्या अफवांबद्दल माझ्या कानावर काही गोष्टी आल्या होत्या.
सुरवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या मृत्यूविषयी देखील ट्विट झाले. पण त्याकडेही मी लक्ष दिले नाही. अफवा परसरविणारे आनंद घेत होते. घेऊ द्या. पण भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांनी या विषयी चिंता व्यक्त केली. माझ्या तब्येतीची चौकशी केली. त्यांच्या चिंतेकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून मी हा खुलासा करतोय. त्याच बरोबर ज्यांनी माझ्या तब्येती विषयी अफवा पसरवली त्यांच्याबद्दलही माझ्या मनात कोणतीही दुर्भावना वा किंतू नाही.”
अमित शाह यांच्याबद्दल अशी होत होती आक्षेपार्ह टिप्पणी
मेरे स्वास्थ्य की चिंता करने वाले सभी लोगों को मेरा संदेश। pic.twitter.com/F72Xtoqmg9
— Amit Shah (@AmitShah) May 9, 2020