• Download App
    महाराष्ट्राला मिळाले देशात सर्वाधिक पीपीई किट्स आणि एन ९५ मास्क | The Focus India

    महाराष्ट्राला मिळाले देशात सर्वाधिक पीपीई किट्स आणि एन ९५ मास्क

    • ० २१.३२ लाखांपैकी महाराष्ट्राला ४.१० लाख पीपीई किट्स
    • ० ५३.७२ लाखांपैकी महाराष्ट्राला ९.७५ लाख एन ९५ मास्क

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : डाॅक्टर्स व नर्सेस यांच्या स्वसंरक्षणासाठी अत्यावश्यक असलेले व्यक्तिगत सुरक्षा वैद्यकीय उपकरणे (पीपीई) आणि एन ९५ मास्कच्या उत्पादनांमध्ये भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने निघाला असल्याने या दोन महत्वांच्या बाबींच्या राज्यांना होणारया पुरवठ्यातदेखील वेगाने वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राला मिळाला असून राज्याला ४.१० लाख पीपीई किट्स तर ९.७५ लाख एन ९५ मास्क मिळालेले आहेत.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपीई किट्सचे उत्पादन प्रतिदिन सव्वा दोन लाखांपर्यंत पोहोचले आहे. ३० मार्चरोजी प्रतिदिन फक्त ३३०० किटस बनविले जात होते. त्यामध्ये फक्त एकाच महिन्यात गरूड भरारी घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यांना २१.३२ लाख पीपीई किट्स देण्यात केंद्राला यश मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक किटस महाराष्ट्राला ४.१० लाख मिळाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (२.०८ लाख), गुजरात (१.८ लाख), मध्य प्रदेश (१.५२ लाख). उत्तर प्रदेश (१.२५ लाख), राजस्थान (१.२४ लाख) आदी प्रमुख राज्यांचा समावेश आहे.

    एन ९५ मास्कच्या उत्पादनांतही लक्षणीय वाढ झाली आहे. प्रतिदिन ६८ हजारांवरून आता २.७५ लाखांवर उत्पादन पोहोचले आहे. आतापर्यंत केंद्राने राज्यांना ५३.७२ लाख एन ९५ वितरीत केले आहेत. यातही महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे पावणे दहा लाखांचा हिस्सा मिळालेला आहे. अन्य राज्यांमध्ये दिल्लीला सुमारे पाच लाख, गुजरातला ४.१४ लाख, मध्य प्रदेशला ३.४५ लाख आणि उत्तर प्रदेशला ३.०५ लाख मास्क मिळाले आहेत.

    व्हेटिंलेटर्ससुद्धा पुरेसे उपलब्ध

    सध्या देशामध्ये सुमारे १९५०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. पण आतापर्यंत फक्त ८८ व्हेंटिलेटर्सचाच (०.३ टक्के प्रमाण) वापर झाला आहे. तरीसुद्धा केंद्र सरकारने ६० हजार व्हेंटिलेटर्सची खरेदी केली आहे. त्यापैकी ३० हजार व्हेंटिलेटर्स मे अखेर, २२ हजार व्हेंटिलेटर्स जून अखेर उपलब्ध होणार आहेत.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??