महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं होतं. आता आपल्याला २१ दिवसांत कोरोनाविरोधातील युद्ध जिंकायचे आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला.
वृत्तसंस्था
वाराणसी : महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं होतं. आता आपल्याला २१ दिवसांत कोरोनाविरोधातील युद्ध जिंकायचे आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. या वेळी नमो अॅपच्या माध्यमातून वाराणसीतील नागरिकांनीही त्यांच्याशी संवाद साधला.
मोदी म्हणाले, महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी २१ दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण २१ दिवसांतच जिंकायचं आहे. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण महारथी, सारथी होते. आज १३० कोटी महारथींच्या जोरावर आपल्याला करोनाविरोधातील ही लढाई जिंकायची आहे. यामध्ये काशीवासियांची देखील मोठी भूमिका असेल.
कोरोनाच्या आजाराचा फैलाव पाहता त्याच्याशी लढण्यासाठी देशभरात व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वांना या काळात घरांमध्ये राहणे गरजेचे आहे. हाच या आजापासून वाचण्याचा चांगला उपाय आहे. करोनाच्या संक्रमितांची जगात १ लाखांपेक्षा अधिक संख्या झाली आहे. भारतात अनेक जण कोरोनाच्या विळख्यातून बाहेरही पडले असल्याचे मोदी यांनी सांगितले.
कोरोना को जवाब देने का दूसरा एक ताकतवर तरीका है और वो है करुणा।
कोरोना का जवाब करुणा से।
गरीबों के प्रति करुणा दिखाकर भी कोरोना को पराजित कर सकते हैं।
अभी नवरात्र शुरू हुआ है। अगर हम 9 गरीब परिवारों की मदद करते, तो इससे बड़ी आराधना मां की क्या होगी?
: नरेंद्र मोदी
कोरोनाला करुणाने उत्तर
पंतप्रधान म्हणाले, कोरोना व्हायरस भारतीय संस्कृतीलाही कधी संपवू शकत नाहीत. आमच्या संस्कारांवरही त्याचा परिणाम होणार नाही. कारण संकटाच्या काळातच आपल्या संवेदना अधिक प्रमाणात जागृत होतात. कोरोनाला उत्तर देण्याचे एक साधन करुणा आहे. केवळ आप्तस्वकीयांच्याच नव्हे तर पशु-पक्षांच्याही खाण्या-पिण्याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागेल. जनता कर्फ्यूच्या दिवशी जनतेने वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आदी अत्यावश्यक सेवा पुरविणार्यांचे टाळ्या वाजून स्वागत केले. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे ही परंपरा सुरू आहे. विमानतळावरही सैन्यदलातील जवानांना पाहिल्यावर त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी लोक उभे राहतात. काही जण टाळ्याही वाजवितात. आभार व्यक्त करण्याची ही पध्दती आमच्या संस्कारांमध्ये आणखी वाढायला हवी. जे लोक अत्यावश्यक सेवांसाठी कार्यरत आहेत त्यांचे आभार आम्हाला मानायलाच हवेत.
Discussing aspects relating to COVID-19 with the people of Kashi. https://t.co/j1Mk00HluB
— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2020
काही सोसायट्यांमध्ये डॉक्टर किंवा नर्स यांना आमच्या येथे राहू नका, असे सांगण्यात येत असल्याच्या घटनांवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा देणार्या कर्मचार्यांचा सन्मान करायला हवा. काही ठिकाणांहून अशा घटनांची माहिती मिळाली आहे की त्यामुळे माझ्या ह्रदयालाच ठेच लागली. डॉक्टर, नर्स यासारख्या सेवाभावींचा सन्मान करायलाच हवा. त्यांच्याबाबत दुर्व्यवहार केला तर त्यांना समजावून सांगा. गृह मंत्रालय आणि सर्व राज्यांच्या पोलीस प्रमुखांना आपण आदेश दिले आहेत. असे प्रकार करणार्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.
एका नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, सरकारने कोरोनाविषयीची माहिती देण्यासाठी हेल्प डेस्क तयार केला आहे.
व्हॉटसअॅपच्या माध्यमातून कोरोनाबाबत सर्व माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 9013151515 या क्रमांकावर नागरिक आपल्या शंका विचारू शकतील, असे मोदी म्हणाले.