विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महंमद साद गायब झालेला नाही. तो भारतातच आहे, असा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. लॉकडाऊनची कायदेशीर बंधने तोडून तबलिगी मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रम सातत्याने घेत होता. या बद्दल सादच्या विरोधात पोलिसांनी विविघ फौजदारी कलमांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर तो २८ मार्चला तबलिगी मरकजमधून कुटुंबासह गायब झाला. मरकज पोलिसांनी खाली केली. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी १२ तुकड्या देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठविल्या. पण साद अद्याप सापडलेला नाही. आता सादच्या वकिलाने दावा केला की तो लपलेला नाही.
तबलिगचे लोक पोलिसांना सहकार्य करतील, असेही वकिलाने सांगितले. २८ मार्च रोजी साद आधी ओखलाला पोचला. नंतर तो कोठे गेला याचा शोध पोलिस घेत आहेत. साद मूळचा उत्तर प्रदेशातील शामली गावचा आहे. दरम्यान, बडी मकी मशीद सील केली आहे. यात निजामुद्दीनच्या मरकरजमधून १२ इंडोनेशियायी नागरिक मकी मशिदीत आले होते.
मरकजमध्ये येऊन तेथील धार्मिक कार्यक्रमात सामील झालेल्या ९६० परकीय लोकांना ब्लँकलिस्ट करण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. या ९६० परकीयांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.