• Download App
    ममतांच्या अरेरावीला बंगाली डॉक्टरांचीही चपराक; कोविड १९ संदर्भात पारदर्शकता ठेवा...!! तृणमूळ खासदाराच्या स्वाक्षरीसह ११ वैद्यकीय संघटनांचे पत्र | The Focus India

    ममतांच्या अरेरावीला बंगाली डॉक्टरांचीही चपराक; कोविड १९ संदर्भात पारदर्शकता ठेवा…!! तृणमूळ खासदाराच्या स्वाक्षरीसह ११ वैद्यकीय संघटनांचे पत्र

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : कोविड १९ संदर्भात केंद्रीय पथकाच्या बंगाल दौऱ्यावरून केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्यात चांगले वाजले असतानाच बंगालमधील डॉक्टरांनी ममता बँनर्जी यांना पत्र पाठवून एक प्रकारे चपराक हाणली आहे. कोविड १९ चा प्रादूर्भाव, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय या संबंधी पारदर्शकता ठेवा, अशी मागणी डॉक्टरांच्या ११ संघटनांनी एकत्र येऊन लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

    या पत्रात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे वैद्यकीय दृष्टीने गंभीर आहेतच. पण ममता सरकारच्या आकसाच्या अरेरावीच्या वर्तणुकीमुळे या पत्राला राजकीय पातळीवर देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या पत्रावर इंडियन मेडिकल कौन्सिलच्या वतीने तृणमूळ काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांचीही स्वाक्षरी आहे.

    कोविड १९ च्या रुग्णांच्या माहिती प्रसारणासंदर्भात बंगालमधील ममता सरकारच्या आधीच संशयाचे वातावरण आहे. कोरोनाग्रस्तांचे खरे आकडे लपविण्यापासून ते उपचारापर्यंत आणि लॉकडाऊनच्या राजरोस उल्लंघनापर्यंत सर्वच बाबतीत ममता सरकारची वर्तणूक संशयाच्या चक्रात आहे. कोरोनाग्रस्तांची ओळख पटविणे, तपासणी, चाचणी आणि मृतांची आकडेवारी या सर्व प्रकारांत सरकार माहिती लपवत आहे. उपचारांबाबत इंडियन मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या प्रोटोकॉल बाजूला सारले जात आहेत. मृतांच्या दाखल्यांवर कारणे बदलून लिहिली जात आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या दाखल्यांची फेरतपासणी करून त्यावरील मरणाच्या कारणांमध्ये फेरफार करण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या सर्व प्रकारांबरोबरच आता डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांच्याही कोरोना प्रतिबंधक उपचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या सर्वांना पुरेशी प्रतिबंधक उपकरणे देण्यात आलेली नाहीत. इंडियन मेडिकल कौन्सिलची नियमावली पाळण्यात येत नाही.

    इंडियन मेडिकल कौन्सिलची बंगाल शाखा आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिकांच्या १० संघटनांनी लिहिलेल्या पत्रात वरील सर्व मुद्द्यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. राज्यात पारदर्शकपणे रोजचे मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध झाले पाहिजे, एवढी माफक अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

    बंगालमधील कोविड १९ ची योग्य आणि आवश्यक माहिती केंद्र सरकारला दिली जात नाही. केंद्र सरकारच्या रोजच्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात येणाऱ्या आकडेवारीत बंगालमधील आकडेवारी कमी किंवा संशयास्पद राहिली होती. यावर केंद्र सरकार आणि पत्रकारांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी ममता बँनर्जी यांना लिहिलेल्या पत्राला मूळात वैद्यकीय पातळीवर महत्त्व असताना राजकीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??