चीनी व्हायरसच्या संकटामुळे परप्रांतीय कामगार गावी निघाले आहेत. ही संधी समजून मराठी तरुणांनी विविध रोजगार मिळवावेत असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. लॉकडाऊन ही मराठी तरुणांसाठी सुवर्णसंधी असल्याचे सांगत मनसेने अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे.
वृत्तसंस्था
मुंबई : चीनी व्हायरसच्या संकटामुळे परप्रांतीय कामगार गावी निघाले आहेत. ही संधी समजून मराठी तरुणांनी विविध रोजगार मिळवावेत असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’ ही मराठी तरुणांसाठी सुवर्णसंधी असल्याचे सांगत मनसेने अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे. मराठी तरुणांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे.
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेले पर प्रांतीय मजूर लाखोच्या संख्येने आपल्या गावी परतण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात परप्रांतीयांचा भरणा झाल्याने राज्यातील मराठी माणसाला रोजगार मिळत नाही, अशी भूमिका मनसेने कायमच घेतली आहे. यासाठी आंदोलनेही केली आहेत. परप्रांतीय गावी जात असल्यने लॉकडाऊनने मराठी माणसाला रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. मराठी तरुणांकडून विविध कामासाठी अर्ज मागविण्यास मनसेच्या कामगार सेनेकडून आवाहन करण्यात आले आहे.
परप्रांतीयाचे लोंढे रोखा असे मनसेच्या स्थापनेपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे सांगत होते. व्होटबँकच्या नावाखाली हे लोंढे थाबविण्याच्या मुद्यावर एकमत होत नव्हते. लॉकडाऊनने ती संधी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा फायदा घेत मनसे त्यांच्य अजेंडावरील कळीचा मुद्दा राबविण्यास सुरुवात केली आहे.
ड्रायव्हर, पेंटर, कार मेकॅनिक, प्लंबर, सीसीटीव्ही कॅमेरा असेंबल्ड, सुरक्षा कर्मचारी, हाऊस किपिंग, कॉम्प्यूटर सव्र्हीस, केअर टेकर, नर्सेस, बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स, ट्रान्सपोर्ट, वॉटर सप्लायर्स ही परप्रांतीयाची मक्तेदारी होती. ते राज्यात काम करीत होते. त्यामुळे मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी नव्हत्या.
आता ते गेल्याने महाराष्टात व्यवसाय छोटा असो की मोठा त्यात मराठी तरुण तरुणीच काम करणार असा निर्धार मनसेच्या कामगार सेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. इच्छूक मराठी तरुणांनी ही संधी न दवडता गुगल फॉर्ममध्ये त्यांची माहिती भर द्यावी असे आवाहन केले आहे