चीनी व्हायरसच्या संकटात मदतीसाठी महिलांना वाटलेल्या सॅनीटरी पॅडवर शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो असल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे. ट्विटरवर हा फोटो व्हायरल झाल्यावर महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनी व्हायरसच्या संकटात मदतीसाठी महिलांना वाटलेल्या सॅनीटरी पॅडवर शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो असल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे. ट्विटरवर हा फोटो व्हायरल झाल्यावर महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वरळी परिसरात चीनी व्हायरसच्या संकटकाळात आदित्य ठाकरे यांच्याकडून मदत दिली जाईल. महिलांसाठी सॅनीटरी पॅडची पाकिटे देण्यात आली आहेत. मात्र, यावर आदित्य ठाकरे यांचा फोटो असल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक म्हणजे काही दुकानदारांनीही हे सॅनीटरी पॅड विकायला ठेवले आहेत.
सध्या सप्लाय चेन विस्कळित झाली असल्याने अनेक ठिकाणी सॅनीटरी पॅडचा तुटवडा आहे. त्यामुळे दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलांनाही आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेले सॅनीटरी पॅड मिळाले. त्यामुळे महिलांनी आपला संताप व्यक्त केला.
काही महिलांनी तर ‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात? असा प्रश्न विचारला आहे. मेडीकल दुकानात महिला सॅनीटरी पॅड खरेदी करायला गेली आणि त्यावर पुरुषाचा फोटो असेल तर कसे वाटेल, असा प्रश्न एका महिलेने विचारला आहे. तर आदित्य ठाकरे यांचे ब्रॅँडींग सॅनीटरी पॅडच्या पाऊचवर पण? तुम्ही सत्तेत आहात, विरोधात नाही. आता तरी जागे व्हा आणि मुख्यमंत्री हा अपला आहे ही भावना तरी मनात ठेवा, असे एकाने म्हटले आहे.
‘सच का सामना’ नावाच्या ट्विटर हॅँडलवरून याला उत्तर दिले गेले आहे. यामध्ये म्हटले आहे की शिवसेनेच्या वतीने मोफत सॅनीटरी पॅडस वाटले गेले आहेत. मात्र, फेक न्यूज पसरवित ते मेडीकलमध्ये विकले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर समाजात द्वेष पसरविण्यासाठी त्यावर पुरुषाचा फोटो असल्यामुळे महिला लज्जीत होत असल्याचे म्हटले जात आहे. या लोकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा.