• Download App
    मका आणि ज्वारीच्या खरेदीला केंद्राची परवानगी; शेतकरयाना दिलासा | The Focus India

    मका आणि ज्वारीच्या खरेदीला केंद्राची परवानगी; शेतकरयाना दिलासा

    मुंबई : राज्यातील मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने मका आणि ज्वारी खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याला २५ हजार मेट्रीक टन मका आणि १५ हजार मेट्रीक टन ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे. यासंदर्भात कृषिमंत्री भुसे यांनी केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र शासनाने परवानगी देणारं पत्र नुकतचं राज्याला पाठविले आहे.

    केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात ह्या खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या भरडधान्य खरेदी धोरणानुसार भारत अन्न महामंडळाच्या (एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशिक शाखेमार्फत खरेदी केली जाणार आहे.

    खरेदी केलेले हे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत ग्राहकांना वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??