• Download App
    भारतीय हेरगिरांची पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये दहशत; एक-एक करून टिपले जात असल्याने उडाली गाळण | The Focus India

    भारतीय हेरगिरांची पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये दहशत; एक-एक करून टिपले जात असल्याने उडाली गाळण

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : भारतातील रॉ किंवा आयबीच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी संघटनेत प्रवेश करून पाकिस्तानी दहशदवाद्यांना टिपण्याच्या अनेक कथा चित्रपट-वेबसिरीजमधून पाहिल्या असतील. अगदी तशीच भीती दहशतवाद्यांना वाटू लागली आहे. आपल्यामध्ये कोणीतरी असून एक-एक करून आपल्या नेत्यांना टिपले जात असल्याचा संशय दहशतवाद्यांना येऊ लागला आहे.

    हिजबुल मुजाहिदीन संघटनेच्या दहशतवाद्यांच्या एका टेपमधून ही माहिती बाहेर आली आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहीमेत भारतीय सुरक्षा दलांना यश मिळत आहे. त्यावरूनच एक ऑडिओ टेप बाहेर आली आहे.

    यामध्ये हिजबुल संघटनेचा एक अतिरेकी म्हणतोय की, संघटनेत कोणी तरी आहे जो एक-एक करून सगळ्यांची हत्या घडवतो आहे. हा अतिरेकी असेही म्हणतो की जुनैद हिज्ब शीराज हिज्बपासून वेगळा झाला होता. त्यामुळे रियाझ नायकूच्या नंतर चीफ ऑपरेशनल कमांडरच्या खुर्चीवर जुनैद यायला हवा होता. परंत, असे घडलेले नाही.

    सुरूवातीला दक्षिण काश्मीरमध्ये डीएसपी दविंदर सिंह याच्यासोबत नवीद बाबू पकडला गेला होता. भारतीय गुप्तचर विभागाने त्याला पकडले होते. त्यानंतर पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत हजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू चकमकीत ठार केले होते. हंदवाडा चकमकीत भारतीय जवान हुतात्मा झाल्यावर ही कारवाई करण्यात आली होती.

    काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधील नवाकदल येथे चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर जैनैद सेहरई ठार झाला होता. तो फुटीरतावादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सचा चेअरमन मोहम्मद अशरफ सेहरई याचा मुलगाही आहे.

    या तीन खतरनाक दहशतवाद्यांच्या हल्यानंतर संघटनेतील प्रमुखपदाच्या खुर्चीसाठी ही लढाई तर नाही ना अशी भीती आता दहशतवाद्यांना वाटू लागली आहे. रियाझ नायकू ठार झाल्यावरही संघटनेत एक दुसऱ्यावर आरोप केले जाऊ लागले होते. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सगळ्यामध्ये भारतीय गुप्तचरांनी आपला एखादा हेर संघटनेत पेरला असावा, अशी भीतीही दहशतवाद्यांना वाटू लागली आहे. भारताचे जेम्स बॉंड समजले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीरकडे विशेष लक्ष दिल्यामुळे ही भीती आणखीनच वाढली आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??