• Download App
    भारतीय हवामान खात्याच्या अंदाज बुलेटिनमध्ये गिलगिट, बाल्टिस्तानचाही समावेश | The Focus India

    भारतीय हवामान खात्याच्या अंदाज बुलेटिनमध्ये गिलगिट, बाल्टिस्तानचाही समावेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान सरकारला कडक संदेश देतानाच त्या विभागाला भारतीय हवामान विभागाने आपल्या उपविभागांमध्ये जोडून घेतले आहे.

    भारतीय हवामान खात्याच्या दररोजच्या हवामान अंदाज बुलेटिनमध्ये जम्मू काश्मीर, लडाख बरोबरच गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद येथील हवामान अंदाज देण्याचाही समावेश करण्यात आला आहे. राजनैतिक दृष्ट्या भारताचे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

    गिलगिट – बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद सह संपूर्ण जम्मू – काश्मीरला भारत सरकार भारताचा अविभाज्य भाग मानते. यातील गिलगिट – बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद वर पाकिस्तानचा बेकायदा कब्जा आहे. पाकव्याप्त काश्मीरचा हा भाग पुन्हा भारताला जोडून घेण्यासंदर्भात भारतीय संसदेने एकमताने ठराव मंजूर केले आहेत. पण आतापर्यंत या भारताची कोणतीही activity तेथे नव्हती.

    भारतीय हवामान खात्याने देशाच्या ३६ हवामान विभागांमध्ये गिलगिट – बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद यांचा समावेश करून महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल उचलले आहे.

    पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे आदेश नुकतेच पाक सुप्रिम कोर्टाने दिले होते. त्यावर भारताने पाकिस्तान सरकारकडे तीव्र आक्षेप नोंदविला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याच्या निर्णयाला महत्त्व आहे.

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    बाळ ते बाळासाहेब; मीरा भाईंदरच्या नव्या कलादालनातून उलगडला भव्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास!!