• Download App
    भारतीय रेल्वेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी चक्क कोचमध्ये आयसोलेशन वॉर्ड | The Focus India

    भारतीय रेल्वेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी चक्क कोचमध्ये आयसोलेशन वॉर्ड

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भारतीय रेल्वेमार्फत पूर्वतयारी म्हणून कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेन्ट वार्ड तयार केले जात आहेत. पुण्यातील घोरपडी येथील कोच रिपेअर डेपो येथे कोचमध्ये सोईसुविधा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आयसोलेशन सुविधेची प्रत्यक्ष पाहणी करुन रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता विजयसिंग धडस, कोचिंग डेपो अधिकारी राहुल गर्ग आदी उपस्थित होते.

    भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कोवीड-19 रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेंट वॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक बोगीत 16 ते 18 रुग्णांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पुणे विभागात पहिल्या टप्प्यात 50 कोच पुरविण्यात येणार आहे. यामध्ये 800 ते 900 रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल.

    रेल्वेने या सुविधेत रुग्णांना सुविधा देण्याच्या दृष्टीने आवश्यक बदल केले असून येत्या दोन दिवसात दोन कोच उपलब्ध होतील, उर्वरित कोच आठ दिवसात उपलब्ध होतील. पुण्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कळजी घेतली जात आहे.

    Related posts

    पवारांची फडणवीस स्तुती, हे विरोध मावळल्याचे लक्षण की त्यांनी फडणवीसांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे लक्षण??

    “पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!

    “पवार संस्कारितां”ची थांबेना दादागिरी; फडणवीस, लवकर साधा सफाईची संधी!!