विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना आणि पालघर प्रकरणांना देशातील काहीजण धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर केंद्रीय मंत्री नक्वी यांनी भाष्य केले आहे. बाहेरचे देश भारतातील मुस्लीम समाज धोक्यात असल्याची भाषा करत आहेत, त्यांनाही नक्वी यांनी उत्तर दिले आहे.भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत.
भारतीय मुस्लिमांची भरभराट होत आहे. वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करणारे अशा मुस्लिमांचे मित्र असू शकत नाही,” असा टोलाही नकवी यांनी लगावला आहे. “भारतामधील सर्व नागरिकांना संविधानिक, सामाजिक आणि धार्मिक हक्क भारतीय संविधानानेच दिले आहेत.
देशातील सर्व मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था आणि भारतीय मुस्लिम समाज यांनी २४ एप्रिलपासून रमजानच्या पवित्र महिन्यात घरी राहून एकत्रितपणे प्रार्थना, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही नक्वी म्हणाले. आपण दक्षतापूर्वक एकत्रित होऊन समाजात दुही माजवणाऱ्या अशा शक्तींच्या प्रचाराला पराभूत केले पाहिजे.