• Download App
    भारताच्या मदतीने भारावले ट्रंप; 'व्हाइट हाऊस' जागतिक नेत्यामध्ये फक्त मोदी व राष्ट्रपतीना करू लागले फॉलो | The Focus India

    भारताच्या मदतीने भारावले ट्रंप; ‘व्हाइट हाऊस’ जागतिक नेत्यामध्ये फक्त मोदी व राष्ट्रपतीना करू लागले फॉलो

    व्हाईट हाऊस एकूण 19 ट्विटर अकाउंटला फॉलो करत आहे. यापैकी 13 जण अमेरिकेचे आणि  सहा भारताशी संबधित आहेत. व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलमध्ये भारतातील  पीएमओ इंडिया आणि भारताचे राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल आहेत. या खेरीज अमेरीकेचे भा रतातील दूतावास, अमेरिकेतील भारताचा दूतावास आणि  भारतातील अमेरिकी राजदूत अशा सहा हँडलना व्हाईट हाऊसने फॉलो करू लागले आहे. 

    वृत्तसंस्था
    नवी दिल्ली : कठीण प्रसंगी मदत करणारा खरा मित्र असतो असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आणि आता व्हाइट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.

    अमेरिकेतील ‘व्हाइट हाऊस’ हे तेथील राष्ट्राध्यक्ष यांचे कार्यालय म्हणून काम पाहते. जगातील सर्वांत जास्त शक्तिशाली असे प्रशासकीय कार्यालय समजले जाते. व्हाइट हाऊसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे पीएमओ ऑफिस आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाचे ऑफीस यांना फॉलो करण्यात येत आहे.

    नरेंद्र मोदी जगातील एकमेव राजकीय व्यक्ती आहेत, ज्यांना हा बहुमान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अमेरिकेशी भारताचे संबंध खूप चांगले झाले. चिनी व्हायरसच्या संकटात ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्लोरोक्वाईन औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. मानवतेच्या धर्माला जागून मोदी यांनी या औषधावरील निर्यातीची बंदी उठविली. त्यामुळे भारत अमेरिका संबंधात नवे पर्व सुरू झाले आहे. त्याचाच भाग म्हणून चिनी व्हायरस विरुद्धच्या लढाईत एकत्रित येऊन काम करण्यासाठी व्हाइट हाऊसने मोदी यांना फॉलो करणे सुरू केले आहे.

    आतापर्यंत व्हाईट हाऊस एकूण 19 ट्विटर अकाउंटला फॉलो करत आहे. यापैकी 13 जण अमेरिकेचे आणि  सहा भारताशी संबधित आहेत. व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलमध्ये भारतातील  पीएमओ इंडिया आणि भारताचे राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल आहेत. या खेरीज अमेरीकेचे भा रतातील दूतावास, अमेरिकेतील भारताचा दूतावास आणि
    भारतातिल अमेरिकी राजदूत अशा सहा भारतीय हँडलना व्हाईट हाऊसने फॉलो केले आहे.
    भारताच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला औषध दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. उत्तर म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत आणि म्हटले आहे की भारत आणि अमेरिका मिळून चिनी व्हायरसला पराभूत करतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील हे संबंध आजपर्यंतच्या सर्वात मजबूत टप्प्यात आहे. मानवतेच्या या लढाईत भारत सर्वांना मदत करण्यास सज्ज आहे.

    Related posts

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    जयंत पाटलांचा “अडथळा” सरताच पवारांच्या घरातच पदांची वाटणी; मुख्य सचिव पदी रोहित पवारांची वर्णी; अख्खी राष्ट्रवादी पवार कुटुंबाच्या सावटाखाली!!

    2633 दिवसानंतर जयंत पाटलांचा राजीनामा; 10 आमदारांचा पक्ष मोठा करण्यासाठी नव्या प्रदेशाध्यक्षांचा प्रस्ताव मांडला!!