विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचे जागतिक स्तरावर कौतूक झाले आहे. घातक विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारताने हे आदर्श मॉडेल कोरोनाग्रस्त देशांपुढे उभे केले आहे, अशी प्रशंसा अमेरिका, युरोप आणि पाकिस्तानमधील नेते, कार्यकर्त्यांनीही केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार कार्यकर्ते अमजद अयूब मिर्झा यांनी मोदींच्या लॉकडाऊन घोषणेचे स्वागत करून पाकिस्तानी नेतृत्वावर कडक टीका केली आहे.
पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असताना नेतृत्व ढिसाळ असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. सगळीकडे अराजक माजले आहे. कोरोनाग्रस्तांना आणि संशयितांना विलगीकरणासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवले जात आहे. हे आम्ही स्वीकारू शकत नाही, अशी टीका मिर्झा यांनी केली तर याच विभागासाठी अमेरिकेतून काम करणारे नेते सेंग एच. सेरिंग यांनी मोदींच्या नेतृत्वगुणांचे कौतूक केले आहे. १३० कोटी जनतेला लॉकडाऊन मध्ये सहभागी करवून घेणे सोपे नव्हते. पण भारतात कुशल नेतृत्वामुळे हे घडले. कोणाताही नागरिक उपचारापासून प्रतिबंधापासून मागे राहू नये, या मोदींच्या सर्वसमावेशक धोरणाला भारतातील विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिल्याची आठवण सेरिंग यांनी करून दिली.
अमेरिकन इंटरनेट आंतरप्यूनेअर मार्क बेनिऑफ आणि योग गुरू डॉ. डेव्हीड फ्राऊली यांनीही मोदींच्या प्रयत्नांची स्तुती केली आहे. १३० भारतीयांच्या मनात मोदींनी कोरोनाचा पराभव करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण केला. अमेरिकेची लोकसंख्यान त्या तुलनेत कमी असूनही येथे ते जमले नाही. लॉकडाऊन गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे अमेरिकत कोरोनाग्रस्त संख्या वाढली, असे बेनिऑफ आणि डॉ. फ्राऊली यांनी म्हटले आहे. २१ दिवसांचे लॉकडाऊन हा भारताचच नव्हे तर जगातला सर्वांत मोठा कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आहे, असे ट्विट बेनिऑफ यांनी केले आहे. मोदींची करुणामय दृष्टी आणि त्यांचे मार्गदर्शन यांचा जगाने लाभ घेतला पाहिजे, असे डॉ. फ्राऊली यांनी नमूद केले आहे.