• Download App
    भारताची दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचणीची क्षमता; प्रगत देशांना मागे टाकले | The Focus India

    भारताची दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचणीची क्षमता; प्रगत देशांना मागे टाकले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात सरकारी लँबची संख्या वाढविल्याने कोरोना संशयितांच्या चाचणीची क्षमता वाढविण्यात आली असून दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचण्या घेण्यापर्यंत वाढविण्यात आली आहे. वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. प्रगत देशांच्या क्षमतेपेक्षाही ही संख्या अधिक आहे. भारतात १११ लँब कोरोना चाचण्यांसाठी कार्यरत आहेत. फ्रान्समध्ये दर आठवड्याला १० हजार, तर ब्रिटनमध्ये १६ हजार जणांच्या चाचणीची क्षमता आहे. अमेरिकेत २४ हजार, जर्मनीत ४२ हजार तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीत ५२ हजार जणांच्या चाचणीची क्षमता विकसित करण्यात आली आहे.
    भारतात खासगी लँबलाही चाचणीची क्षमता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या खासगी लँबची देशात 15 हजार केंद्र आहेत. शिवाय 111 सरकारी संस्था मध्ये ही सुविधा आहे.

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??