• Download App
    बँरिस्टर अंतुलेंच्या पुत्राचे निधन | The Focus India

    बँरिस्टर अंतुलेंच्या पुत्राचे निधन

    विशेष प्रतिनिधी 
    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बँ. ए. आर अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले यांचे ह्रदयविकाराने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
    अनेक वर्षे राजकारणापासून दूर असलेल्या नविद अंतुले यांनी मागील वर्षी अचानक राजकारणात प्रवेश करून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ए आर अंतुले यांचे पुत्र असणाऱ्या नविद अंतुले यांच्या राजकारण प्रवेशामुळे रायगडच्या राजकीय अपेक्षा वाढवल्या मात्र त्यांनी अचानक शिवसेनेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला.
    त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचारफेरीत भाग घेत शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

    Related posts

    काँग्रेसने लावली कम्युनिस्टांच्या अखेरच्या गडाला घरघर ही खरी केरळ मधली बातमी!!

    हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरातून एकनाथ शिंदेंची विदर्भ + मराठवाड्यात राजकीय मुशाफिरी

    पवार काका – पुतण्यांनी एकत्र येण्यासाठी जोर लावलाच, तर होईल काय??