• Download App
    अफवा पसरवणार्‍या नेटकर्‍यांनो... सावधान! महाराष्ट्र सायबर शाखेने नोंदवले 161 गुन्हे | The Focus India

    अफवा पसरवणार्‍या नेटकर्‍यांनो… सावधान! महाराष्ट्र सायबर शाखेने नोंदवले 161 गुन्हे

    चीनी व्हायरससंदर्भात फेक न्यूज (खोट्या बातम्या), द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणार्या विरोधातल्या लढ्यालाही केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, त्यांनी फेक न्यूज विरोधी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश  दिले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : चीनी व्हायरससंदर्भात फेक न्यूज (खोट्या बातम्या), द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणार्या विरोधातल्या लढ्यालाही केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, त्यांनी फेक न्यूज विरोधी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश  दिले आहेत.

    महाराष्ट्र पोलीस, राज्यात, सायबर कायद्याची तत्परतेने अंमलबजावणी करत असून, व्हाटसअ‍ॅप ग्रुप एडमीन आणि सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात, काय  करावे आणि काय करू नये याबाबत गेल्या  सूचनावली जारी केली आहे.

    लॉक डाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत, महाराष्ट्र सायबर शाखेने, सोशल मिडीयावर, फेक न्यूज, अफवा आणि द्वेषमुलक वक्तव्य करण्याविरोधात 161 गुन्हे नोंदवले आहेत. बीड मधे सर्वात जास्त म्हणजे 22 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापूर 13, पुणे ग्रामीण 12, मुंबई 11 आणि जळगावला 10 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
    कोविड-19 आणि त्याच्या उपचाराबाबत प्रामुख्याने अफवा पसरवल्या जात असल्याचे आढळले. सोशल मिडीयावर द्वेषमुलक वक्तव्याकडेही वाढता कल दिसून आला असून यासंदर्भात, 73  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 39 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
    गेल्या 48 तासात, महाराष्ट्रात, कोरोना महामारीबाबत, सोशल मिडिया आणि इतर आॅनलाइन मेसेज चॅनेलवर फेक न्यूज, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणे यासंदर्भात 30 प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले. व्हाटस अ‍ॅप, फेस बुक आणि टिक टॉक यांचा यासाठी बर्याचदा दुरुपयोग केला जात आहे.

    सोशल मिडीयावर फेक न्यूज, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणे याबाबत जनतेला जागरुक आणि सतर्क, करण्यासाठी सायबर पोलीस प्रयत्न करत आहेत.  प्रत्येक जिल्ह्याच्या सोशल मिडिया हँडलद्वारे जनतेपर्यंत पोहोचत आहेत.

    आता एकालाच फॉरवर्ड करता येणार

    चीनी व्हायरससंबंधी काहीही पोस्ट लोक एकमेकांना पाठवत आहेत. या पाठवण्यात आलेल्या बर्याच पोस्ट या फॉरवर्डेड असतात. त्या खर्या की खोट्या याची खातरजमा न करता अनेक जण या पोस्ट डोळेझाकपणे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवत असतात. खोट्या, फेक बातम्यांना आळा घालण्यासाठी तसेच या बातम्यांना रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने एक महत्त्वाचे पाऊल उचलेले आहे. आता एकाचवेळी एका व्यक्तीला फॉरवर्डेड मेसेज पाठवता येईल.

    याआधी ही फॉरवर्डेड संख्या ५ इतकी होती. फेक बातम्या ओळखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने पावलं उचलली आहेत. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेली फेक न्यूज व्हेरिफाय करण्यासाठी कंपनीने नवीन फीचर आणले आहे. आता युजसंर्ना फॉरवर्ड मेसेजच्या बाजुला आलेल्या सर्च आयकॉनवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट वेब सर्च करता येवू शकणार आहे. परंतु, हे फीचर काही निवडक युजर्संपर्यंत पोहोचले आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…