• Download App
    फिट इंडियातून विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे | The Focus India

    फिट इंडियातून विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून लॉकडाऊनच्या काळात घरातच बसावे लागलेल्या मुलांसाठी फिट इंडिया चळवळ सुरू करण्यात आली आहे. व्यायामाच्या प्रात्यक्षिकांसोबतच, सोप्या युक्तिंनी, रोगप्रतिबंधक शक्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले  जाणार आहे.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून लॉकडाऊनच्या काळात घरातच बसावे लागलेल्या मुलांसाठी फिट इंडिया चळवळ सुरू करण्यात आली आहे. व्यायामाच्या प्रात्यक्षिकांसोबतच, सोप्या युक्तिंनी, रोगप्रतिबंधक शक्ती वाढविण्यासाठी करण्याच्या उपायांबाबतही आयुष मंत्रालयाद्वारे मार्गदर्शन केले  जाणार आहे.

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकायार्ने सुरू होत आहे. देशातल्या ११ हजार सहाशे ब्याऐंशी शाळा फिट इंडिया चळवळीत सामील झाल्या आहेत. या अशा उपक्रमांमुळे शालेय विद्यार्थ्यांना केवळ लाँकडाऊनच्या काळातच व्यग्र   राहून फायदा होईल असे नाही, तर शारिरीक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैली राखण्याबाबत कायम स्वरुपी प्रेरणा मिळेल आणि हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या मागचा दृष्टीकोन आहे, असे मत मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरीयाल यांनी व्यक्त केले.

    “मुले घरातच असून, सध्या त्यांच्या शारिरीक हालचालींवर मयार्दा आल्या आहेत. शारिरीक शिक्षण तज्ञांच्या या प्रात्यक्षिकांमुळे मुलांना घरच्या घरी , सुदृढ रहाण्यास मदत होईल.सध्याच्या काळात, प्रत्येकाने, विशेषत: मुलांनी, शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त रहाणे आणि रोगप्रतिबंधकशक्ती वाढवणे गरजेचे आहे, असे केंद्रीय युवाकल्याण आणि क्रीडा मंत्री किरण रिजीजू यावेळी म्हणाले.

    चीनी व्हायरसमुळे कराव्या लागणार्या लाँकडाऊन कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिलेल्या तंदुरुस्त रहाण्याच्या आणि रोगप्रतिबंधक शक्ति वाढविण्याचे आवाहन केले आहे. या ‘फिट इंडिया चळवळ’ आणि ‘सीबीएससी ‘ने शालेय विद्यार्थांच्या तंदुरुस्तीसाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

    15 एप्रिल 2020 पासून सकाळी 9:30 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना, फिट इंडिया चळवळ आणि सीबीएससीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या हँन्डलवरून ही प्रात्यक्षिके पहाता येणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार यू ट्यूबवर देखील ही प्रात्यक्षिके पहाता येतील. हा प्रात्यक्षिकांमधून मुलांसाठी  विविध व्यायाम प्रकार, योगासने यांसह पोषणयुक्त आहार, तसेच मानसिक स्वास्थ्य या विषयांबाबत मार्गदर्शन केले जाईल. सुप्रसिद्ध व्यायामतज्ञ आलिया ईम्रान, पोषणतज्ञ पूजा माखिजा, मानसिक स्वास्थ तज्ञ डॉ. जितेंद्र नागपाल, योगतज्ञ हिना भीमानी यांच्यासह इतर अनेक तज्ञ या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

    Related posts

    भारत – पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेण्याची अमेरिकेची धडपड; त्या पाठोपाठ सिंधू जल करारात ब्रिटनची लुडबुड!!

    Kapil sibal सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळांमधून परदेशांमध्ये पाठवणी; पण कपिल सिबब्लांची (स्व)पाठ थोपटणी!!

    भाजप मधला talent vacuum शशी थरूर भरताहेत, तर मग काँग्रेसवाले का “रिकामे” राहताहेत??