प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून आरोग्य कर्मचाऱ्सांसाठी विमा संरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. चीनी व्हायरसविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याचा दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. चीनी व्हायरसविरोधात लढणाºया आरोग्य कर्मचाऱ्याचा दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे.
कोविड-19 च्या रुग्णांशी थेट संपर्क येणारे सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी आणि निवृत्त स्वयंसेवक, स्थानिक स्वराज्य संस्था, कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी/, तात्पुरत्या सेवेतील कर्मचारी, राज्य- केंद्र सरकार आणि स्वायत्त संस्थांची रुग्णालये, मिशनरी रुरुग्णालयांनी कोविड19 शी संबंधित आरोग्यविषयक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घेतलेल्या बाह्य कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवा संस्थांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी एखाद्या एजन्सीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांनाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे. ३० मार्चपासून ९० दिवस ही योजना चालू राहणार आहे. या योजनेस पात्र ठरण्यासाठी व्यक्तीला काही हप्ते भरण्याची गरज नाही. या योजनेचा संपूर्ण खर्च भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाद्वारे केला जाणार आहे. एखाद्या व्यक्तीचा इतर कुठलाही वैयक्तिक विमा असेल, तरीही, त्याला या विम्याची पूर्ण रक्कम मिळणार असून, ती अतिरिक्त मदत असेल.
कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांसाठीही पन्नास लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केंद्र सरकारने यापुर्वीच केली आहे. तोच धोका पत्करून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आता तोच लाभ देण्याचा निर्णय घेऊन नरेंद्र मोदी सरकारने सबका साथ सबका विकास या घोषणेची अंमलबजावणी केली आहे.