• Download App
    पोस्टाने औषधे वेळेत पोहोचली; वृद्धांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसला | The Focus India

    पोस्टाने औषधे वेळेत पोहोचली; वृद्धांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसला

    पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांनी नंदूरबार जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त प्रतिबंधित भागात औषधे वेळेत पोहोचवली. त्यामुळे तेथील वृद्धांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसलाच पण पोस्ट खात्याला या वृद्धांचे भरभरून आशीर्वादही मिळाले.


    विशेष प्रतिनिधी

    नंदूरबार : जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि त्याच्या घराजवळील क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर झाले. या क्षेत्रात काही रुग्ण आणि वृद्ध व्यक्तीदेखील होते. त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा याकडे लक्ष देण्याची गरज असताना पोस्ट खाते मदतीला धावून आले आणि अनेकांच्या चेहर्‍यावर हसू फुलले.

    कोविड-19 विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अहोरात्र काम करत आहे. संपूर्ण देशभर लॉकडाउन सुरुच आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने प्रतिबंधीत क्षेत्रेदेखील वाढते आहे. अशा परिस्थितीत अधिकारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या लढाईमध्ये आपले मोलाचे योगदान देत आहेत. या सर्व कोरोना योद्धासोबतीने पोस्टमन काम करीत आहे.

    केंद्र सरकारने पोस्ट खात्याची सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवल्याने देशातील सर्व पोस्टमन या लॉकडाउन काळामध्ये आपली सेवा देत आहे. नागरीकाचे स्पीड पोस्ट,रजिस्टर तसेच महत्वाचे टपाल, वृद्धांचे पेन्शन पेपर, पार्सल वितरण करणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांना घरपोच देणे, इत्यादी अंत्यत महत्वाचे कामे पोस्टमन करत आहेत.
    सर्वात महत्वाचे म्हणजे गरजेची औषधे घरपोच पोहोचविण्याचे कामदेखील पोस्टमनमार्फत होत असल्याने अनेक वयोवृद्धांचे आशिर्वाद त्यांना मिळत आहेत. देश आणि राज्याच्या विविध भागातून पार्सल नंदुरबार मध्ये वितरीत करण्यासाठी आली होती. त्यामध्ये अत्यंत महत्वाची औषधे होती. त्यामुळे ती त्वरीत पोहाचविणे निकडीचे होते.

    धुळे डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांनी विशेष व्यवस्था करुन त्वरीत सदरची पार्सल नंदुरबार येथे पोहोच केली. नंदुरबार मध्ये संचारबंदी असताना देखील पोस्टमास्तर भालचंद्र जोशी तसेच त्याचे सहकारी पोस्टमन सतीश शिंदे, सिध्देश्वर माळी यानी जीवाची पर्वा न करता त्वरीत सर्व औषध पार्सलचे वितरण ठरावीक वेळेत केले.

    लॉकडाउन मुळे औषधे वेळेत पोहोच होणार की नाहीत या चिंतेत असलेल्या रुग्णांना अचानक पोस्टमन औषधे घेऊन आल्याने झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत असल्याचे शिंदे सांगतात. या संकटकाळी आपणही काहीतरी योगदान देऊ शकलो याचे समाधान या दोघांना आहे. यानिमित्ताने सामान्य माणसाचे पोस्टाशी असलेले जुने नाते आणखी घट्ट होण्यास मदत झाली आहे. औषध आणि पेन्शनच्या रुपाने ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनात झालेली आनंदाची पेरणी निश्चितपणे प्रत्येक कोरोना योद्ध्याचा उत्साह वाढविणारी आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…