• Download App
    पुण्यात आणखी दोन मृत्यू | The Focus India

    पुण्यात आणखी दोन मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे शहराच्या करोनाची बाधा झालेल्या दोन रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. यामध्ये एका ६० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तर ४८ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. पुरुषाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचे अहवाल रात्री उशिरा आले होते. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
    तसेच, ६० वर्षांची महिला काही दिवसांपूर्वी डाॅ.नायडू रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. तिची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला नायडू रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला काल ससूनला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ती मयत झाली. दरम्यान, तिचा स्वब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाला असून तिला करोनाची लागण झाल्याचे या अहवालात निष्पन्न झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    बाळ ते बाळासाहेब; मीरा भाईंदरच्या नव्या कलादालनातून उलगडला भव्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास!!