विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “सॉरी, मोदीजी. रात्री सव्वा बारा वाजता फोन केला. पण मला उद्या सकाळ पर्यंत कोरोना चाचणी किट्स भूवनेश्वरमध्ये पाहिजे आहेत. प्लीज काही तरी करा आणि माझा शब्द खाली पडू देऊ नका,” ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईकांचा फोन आला आणि खरेच त्यांच्या इच्छेनुसार चाचणी किट्स सूर्य उगवायच्या आत भूवनेश्वर विमानतळावर हजर होती. त्याची ही गोष्ट…!!
पटनाईकांनी खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना रात्री सव्वा बारा वाजता फोन केला होता. चाचणी किट्स मुंबईत अडकून पडली होती. ट्रक वाहतुकीला परवानगी नव्हती. पटनाईकांनी मुंबई किंवा नाशिक विमानतळ तात्पुरता उघडण्याची मोदींना विनंती केली. मोदींनी त्यांना यात वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. पीएमओ रात्रीतून हालले. फोनाफोनी झाली. मेसेज गेले.
मध्यरात्रीनंतर नाशिक विमानतळ उघडण्यात आला. तो पर्यंत चाचणी किट्स नाशिक विमानतळापर्यंत पोहोचली होते. तेथून एअर फोर्सच्या खास विमानाने सकाळी सूर्योदयाच्या आत ती भूवनेश्वरमध्ये विमानतळावर उतरविण्यात आली. तेथे वेगवेगळ्या ठिकाणी चाचणी किट्स नेणारी वाहने तयार ठेवण्यात आली होती. ती देखील गरजेच्या ठिकाणी वेळेत पोहोचली.
एक मुख्यमंत्री जनतेची सेवा करू इच्छितात; त्यांचा शब्द पीएमओ ने खाली पडू दिला नाही. मोदी २४ × ७ उपलब्ध आहेत, याची प्रचिती आली…!!