पालघर येथील अमानूष हत्याकांडात कम्युनिस्ट पक्षाचा हात असल्याचा धक्कादायक आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. यामुळे सगळ्या डाव्या संघटना या प्रकारावर गप्प असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली असून महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना नोटीस दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पालघर येथील अमानुष हत्याकांडात कम्युनिस्ट पक्षाचा हात असल्याचा धक्कादायक आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रायांनी केला आहे. यामुळे सगळ्या डाव्या संघटना या प्रकारावर गप्प असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली असून महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना नोटीस दिली आहे.
संबित पात्रा यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या घटनेला कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार धरलं आहे. पात्रा यांनी याविषयी एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जिथे साधूंची निघृर्णपणे हत्या करण्यात आली,
ही घटना डहाणू विधानसभा मतदारसंघात घडली आहे. हा मतदारसंघ सीपीआय (एम)चा गढ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाचा आमदारही कम्युनिस्ट पक्षाचा आहे. या मतदारसंघात सीपीआय (एम) बरोबर राष्ट्रवादीची आघाडी केली आहे. हे हत्याकांड मार्क्सवादी गुंडाचं काम आहे. त्यामुळे पूर्ण डाव्या संघटना गप्प आहेत,असा आरोप पात्रा यांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन साधूंची जमावानं हत्या केली होती. गुरुवारी रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकर्यांनी अमानुषपणे मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवा पसरली होती. त्यातून ही घटना घडल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पालघरमधील मॉब लिंचिंग प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतलीय. या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. येत्या ४ आठवड्यात नोटीसला उत्तर द्यावे, असे आयोगाने म्हटले आहे.
पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे निदर्शनास आला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत हे हत्याकांड घडले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात काय कारवाई केली. तसंच मृतांच्या निकटवतीर्यांना काय मदत केली? याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटलं आहे.
करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत पोलीस आणि प्रशासनाचा बंदोबस्त कडक असायला हवा होता. तरीही पोलिसांदेखत निष्पाप साधूंची हत्या करण्यात आली. या घटनेत माणसाच्या जगण्याचा अधिकार हिसकावला गेलाय, असं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नमुद केलंय.