महाराष्ट्रातील पालघर येथे माणुसकीला कलंक फासणाऱ्या आणि पोलीसांच्या भूमिकेवरच संशय निर्माण करणाऱ्या पालघर येथील साधुंच्या हत्याकांडाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक किंवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) व्हावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे या प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रातील पालघर येथे माणुसकीला कलंक फासणाºया आणि पोलीसांच्या भूमिकेवरच संशय निर्माण करणाऱ्या पालघर येथील साधुंच्या हत्याकांडाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक किंवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) व्हावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे या प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पालघर येथे मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून तीन साधूंची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलीसांनीच या साधूंना जमावाच्या हवाली केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तर संताप आणखीनच वाढला होता. त्यानंतर या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या माध्यमातून या घटननेची कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी किंवा सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलीय. सोबतच या घटनेची ट्रायल महाराष्ट्रातून हलवून दिल्लीत करण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आलीय.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. न्यायालयानं संबंधित याचिकेची प्रत याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावी तसेच राज्याने सर्वोच्च न्यायालयाकडे चार आठवड्यांत प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
पालघरमध्ये जमावाकडून झालेली हत्या ही पोलिसांसमोर झाली. पोलीस साधूंना सुरक्षा देऊ शकले नाहीत. लॉकडाऊन दरम्यान जमाव होऊ देणं, हाच पोलिसांचा बेजबाबदारपणा आहे. या बेजबाबदार पोलिसांवर कारवाई व्हावी आणि त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जावेत, असेही याचिकेत म्हटलंय.