• Download App
    पाकिस्तानी सैन्यात बगावत; बलुची अधिकाऱ्याने पाकिस्तान्याला घातली गोळी -बलुची सैनिकांनी जाळली मेस | The Focus India

    पाकिस्तानी सैन्यात बगावत; बलुची अधिकाऱ्याने पाकिस्तान्याला घातली गोळी -बलुची सैनिकांनी जाळली मेस

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानी विरुद्ध बलुची या गेल्या अनेक वर्षापासून धुमसत असलेल्या संघर्षाने शुक्रवारी वेगळेच वळण घेतले. पाकिस्तानी सैन्यात कर्नल असणआऱ्या मौला बक्ष लाहोरी यांच्यावर 31 बलुच रेजिमेंटमधील मेजर गुल मारजान बुगती यांनी गोळ्या झाडल्या. यात लाहोरी यांचा मृत्यू झाला. हे दोन्ही सैन्याधिकारी वाळवंटात तैनात होते. गोळीबार होण्यापुर्वी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी सांगितले, की लाहोरी जागीच ठार झाले.

    बुगती यांनी लाहोरींना गोळ्या घालून ठार केल्यानंतर बलुची सैनिकांनी बुगतींच्या नेतृत्वाखाली बगावत केली. खवळलेल्या 84 बलुची सैनिकांनी डोमेल कॅंट येथील 420 ब्रिगेडची मेस जाळून टाकली. पाकिस्तानी सैन्यातील वरीष्ठांनी मात्र तूर्तास यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून ठार झालेले लाहोरी मिसींग असल्याचे अधिकृतपणे सांगितले जात आहे. सूत्रांनी सांगितले, की डोमेल कॅंटमधील सर्व पश्तुन आणि बलूच अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी सैन्यातील ड्यूटी सोडून दिली आहे. ही बंडखोरी पाकिस्तानी सैन्यात जंगलातील वणव्याप्रमाणे पसरु लागली आहे.

    भारतीय सैन्यातील शीख सैनिकांमध्ये असंतोष पेरण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून 1980 च्या दशकात झाला होता. मात्र त्यावेली देशभक्त शीख सैन्याने हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी सैन्यात मात्र लाहोरी-पंजाबी पाकिस्तानी सैनिक आणि पख्तुनी-बलुची सैनिक यांच्यात जोरदार वादंग माजला आहे. त्याची परिणीती लाहोरी यांच्या हत्येत झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान हा संघर्ष चिघळण्याची चिन्हे असल्याने पाकिस्तानी सैन्याला पस्चिम सीमेवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…