• Download App
    पाकिस्तानात सिंध सरकारने हिंदूना धान्यवाटप नाकारले | The Focus India

    पाकिस्तानात सिंध सरकारने हिंदूना धान्यवाटप नाकारले

    विशेष  प्रतिनिधी

    कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लियारी, सच्चल गोथ, रिरहारी गोथ येथील हिंदू समूदायाला सिंध सरकारकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू नाकारल्या जात आहेत. ही धक्कादायक माहिती तेथील मानवाधिकार कार्यकर्ते अमजद आयुब मिर्झा यांनी उघड केली आहे. रिरहारी येथे गरीब, मजूर, कामगारांना सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून धान्यवाटप सुरू होते.

    हिंदू समूदायातील लोक तेथे धान्य घेण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे वाटप फक्त मुस्लिमांसाठी आहे तुमच्यासाठी नाही, असे सांगून त्यांना हाकलून लावण्यात आले. या अमानवी प्रकारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करून राजस्थानमार्गे सिंधमधील हिंदूंसाठी मदत पाठवावी, अशी मागणी मिर्झा यांनी केली आहे. सिंध प्रांतात ५० लाख हिंदू राहतात. त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण झाले पाहिजे, असेही मिर्झा यांनी सांगितले.

    Related posts

    सत्तेवर नेमके आहेत कोण??

    दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फलटण मधून ग्वाही!!

    बॉलीवूडची खानावळ नाही राहिली “उपयोगी”; म्हणून पाकिस्तानने वाढविली “दहशतवाद्यांची” यादी!!