चीनी व्हायरसच्या संकटामुळे चीन आणि अमेरिका यांनी पाकिस्तानला वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्याच तुकड्यांवर अर्थव्यवस्था चालविण्याची सवय लागलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था वाईट झाली आहे. गरीबी प्रचंड वाढत आहे. लोकांना अन्न विकत घेणे परवडत नाही. त्यातच कोरोनाचे संकट. त्यामुळे आता दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादाचा पत्ता पाकिस्तानने बाहेर काढला आहे. अॅटमबॉंब वाचविण्यासाठी भीकेची मोहीम पाकिस्तानाने सुरू केली असून पंतप्रधान इम्रान खान यांच्या क्रिकेट टीममधला सहकारी जावेद मियॉंदादने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : चीनी व्हायरसच्या संकटामुळे चीन आणि अमेरिका यांनी पाकिस्तानला वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्याच तुकड्यांवर अर्थव्यवस्था चालविण्याची सवय लागलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादाचा पत्ता बाहेर काढला असून देशाकडील अॅटमबॉंब वाचविण्यासाठी भीकेची मोहीम पाकिस्तनाने सुरू केली आहे. माजी क्रिकेटपटू जावेद मियॉंदादने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियॉंदाद म्हणाला की, देशावरील वाढत्या कजार्मुळे अॅटमबॉम्ब धोक्यात आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ जारी करुन, हा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, जर पाकिस्तानने देशावरील कर्ज फेडले नाही, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या (आयएमएफ) संघटना त्यांचे अॅटम बॉम्ब घेऊन जातील. मियॉँदादने हे कर्ज फेडण्यासाठी एक बँक अकाउंटदेखील ओपन केले असून, पाकिस्तानी नागरिकांना त्यात पैसे जमा करण्याची अपील केली आहे.
मियांदाद याने शनिवारी रात्री ट्विटरवर एक व्हिडिओ जारी केला आहे.
त्यात म्हटले की, मी नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानमध्ये एक अकाउंट उघडले आहे. पाकिस्तानचा अॅटम बॉम्ब वाचवण्यासाठी मी पाक नागरिकांना यात पैसे जमा करण्याची भीक मागतो. जर आपण आयएमएफसारख्या संघटनांचे कर्ज फेडले नाही, तर ते आपला बॉम्ब घेऊन जातील. मला माहित आहे की, देशातील काही लोक आपल्या देशाला बुडवत आहेत. आत त्यांनी मला भीक देऊन आपल्या पापांचे प्रायश्चित करावे. परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनीदेखील आपले कर्तव्य पार पाडावे.
मियांदाद भारताचा मोस्ट वॉँटेड कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे व्याही आहेत. व्हिडिओततो म्हणतो की, माझे नवीन अकाउंट इंटरनॅशनल आहे आणि याचा वापर फक्त मी करेल. आपण आयएमएफचे कर्ज फेडणार. नागरिकांनी दर महिन्याला यात पैसे जमा करावेत. सध्या आपल्या देशावर खूप कर्ज आहे. आपण अजून कजार्ची मागणी आयएमएफकडे केली, तर ते आपले अॅटम बॉम्ब मागतील. या बॉम्बला वाचवण्यासाठी त्यांचे पैसे परत करावे लागतील. यासाठी मी तुमच्याकडे भीक मागतोय.
पाकिस्तानातचा माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान सध्या देशाचा पंतप्रधान आहे. त्यांच्या संघाच्या दुसºया माजी कर्णधाराशी त्यांचे तणावाचे संबंध राहिले आहेत. त्यामुळे इम्रान खान यांना बदनाम करण्यासाठी मियॉँदाद याने ही मोहीम सुरू केल्याचे म्हटले जात आहे