• Download App
    "पश्चातबुद्धी" नितीन राऊतांनी मानले वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार | The Focus India

    “पश्चातबुद्धी” नितीन राऊतांनी मानले वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील वीज पुरवठा विना व्यत्यय सुरू राहिल्याबद्दल राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पश्चात बुद्धीने आभार मानले. याच राऊतांनी दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दुगाण्या झोडताना नँशनल पॉवर ग्रीड बंद पडेल. वीज पुरवठा सुरळीत व्हायला ८ ते १० तास लागतील, असा दावा केला होता. केंद्रीय उर्जामंत्री, नँशनल पॉवर ग्रीडचे वरिष्ठ अधिकारी हे पॉवर ग्रीडला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही, असा निर्वाळा देत असतानाही नितीन राऊत त्यांचे न एेकता स्वत:चेच म्हणणे मीडियात रेटत होते. त्यावेळी त्यांचा नँशनल ग्रीडच्या क्षमतेवर आणि महाराष्ट्रातील वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नव्हता. पण प्रत्यक्षात रविवारी रात्री ९.०० ते ९.०९ या नऊ मिनिटांमधील घरगुती वीज दिवे बंदचे पंतप्रधानांचे आवाहन अभूतपूर्व यशस्वी झाले. त्यानंतर वीज पुरवठा देखील विना व्यत्यय सुरू राहिला. मग नँशनल पॉवर ग्रीडवर आणि महाराष्ट्रातील वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याखेरीज राऊत यांच्याकडे पर्यायच उरला नाही. रविवारी रात्रीच्या वेळी राऊत म्हणे स्वत: महाराष्ट्रातील वीज पुरवठा “नियोजन” करीत होते. वीज पुरवठा सुरळित झाल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि “पश्चातबुद्धीने” वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…