• Download App
    पंतप्रधानांनी मानले मदत करणार्‍या कलावंतांचे आभार | The Focus India

    पंतप्रधानांनी मानले मदत करणार्‍या कलावंतांचे आभार

    देशावर आलेल्या कोणत्याही आपत्तीच्या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील मंडळी सर्वसामान्य लोकांच्या मदतीला नेहमीच धावून गेलेली आहेत. आताही कोरोनाचे संकट गहिरे होत असताना या साथीचा मुकाबला करण्यासाठी मदतीसाठी धावून आलेल्या कलावंतांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर आभार मानले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशावर आलेल्या कोणत्याही आपत्तीच्या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील मंडळी सर्वसामान्य लोकाच्या मदतीला नेहमीच धावून गेलेली आहेत. आताही कोरोनाचे संकट गहिरे होत असताना या साथीचा मुकाबला करण्यासाठी मदतीसाठी धावून आलेल्या कलावंतांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर आभार मानले आहेत.
    चित्रपटसृष्टीतील अक्षय कुमार, प्रभास, कार्तिक आर्यन माधुरी दीक्षित, भूमी पेडणेकर, आयुष्यमान खुराना, आलिया भट, करण जोहर आदी नामवंतांनी पंतप्रधान मदत निधीला सढळ हस्ते देणगी दिली आहे.  अक्षय कुमारने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटी रुपये दिले आहेत. बाहुबलीफेम प्रभासने चार कोटी रुपये दिले आहेत. रणदीप हुड्डाने एक कोटी रुपयांची मदत केली आहे.
    तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांनी दोन कोटी रुपये मदत निधीला दान केले आहेत. तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही प्रत्येकी 50 लाखांची मदत करणार असल्याचे त्याने सांगितलं. याशिवाय पवन कल्याण यांचा पुतण्या रामचरणने 1 कोटी 40 लाख, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीने 1 कोटी आणि महेश बाबूने 1 कोटी रुपये दान केले आहेत.
    बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने मुंबई महापालिका कर्मचाºयांसाठी  एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर कपिल शमार्नेही पंतप्रधान मदत निधीमध्ये 50 लाख रुपयांची रक्कम दान केली आहे.
    कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रजनीकांत, विकी कौशल, कतरिना कैफ, सारा अली खान, वरुण धवन, अजय देवगण, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा आदी नामवंत कलाकारांनी पंतप्रधान मदत निधीला देणग्या दिल्या आहेत. प्रख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी कोरोनाग्रस्तांच्या सहाय्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री मदत निधीला देणगी दिली आहे. ही माहिती माधुरी दीक्षितने सोशल मिडियाद्वारे दिली.
    पंतप्रधान मदत निधीऐवजी युनिसेफ, गिव्ह इंडिया, इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज या संस्थांना देणगी देण्याचा निर्णय अभिनेता सैफ अली खान तसेच त्याची पत्नी व अभिनेत्री करिना कपूर यांनी घेतला आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयावर नेटकर्य्यांनी टीका केली आहे. भारतातील सेवाकायार्ला मदत करण्याचे दोघांनी कौशल्याने टाळले आहे, असे काही जणांनी म्हटले आहे.
    लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या चित्रपट विश्वातल्या २५ हजार रोजंदारीवर काम करणाºयांना  आर्थिक मदत करण्याची जबाबदारी सलमानन खानने  घेतली आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…