• Download App
    पंतप्रधानांनी का तातडीने लागू केला लॉकडाऊन ? | The Focus India

    पंतप्रधानांनी का तातडीने लागू केला लॉकडाऊन ?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ मार्च रोजी तातडीने निर्णय घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामागील कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. लॉकडाऊनच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही तर एक व्यक्ती ३० दिवसांत ४०६ लोकांपर्यंत चीनी व्हायरसचा संक्रमण पोहोचवू शकते.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिल्लीच्या आयसीएमआरने केलेल्या सर्वेक्षणाची माहिती दिली. एक चीनी व्हायरस संक्रमित व्यक्ती किती लोकांपर्यंत संक्रमण पोहचवू शकते, याचे अध्ययन केले असता हे प्रमाण – 1.5 ते 4 इतके आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या अध्ययनानुसार, जर हे प्रमाण 2.5 इतके गृहीत धरले तर, कुठलाही लॉकडाऊन नसताना किंवा सामाजिक अंतराचे नियम पाळले नाहीत तर, एक व्यक्ती 30 दिवसात 406 लोकांपर्यंत संसर्ग पोचवू शकते. दुसऱ्या बाजूने, जर, सामाजिक संपर्क टाळले तर, हाच धोका 75 टक्क्यांनी कमी होतो, म्हणजेच ही संक्रमित व्यक्ती केवळ 2.5 लोकांना संसर्ग देऊ शकते. म्हणूनच, सर्व जनतेला सामाजिक अंतराचे नियम पाळण्याची कळकळीची विनंती आहे; कोविड-19च्या व्यवस्थापनात हीच ‘सामाजिक लस’ आहे.

    केंद्रीय आरोग्य विभागाने राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातील पॅटर्न देशात सगळीकडे वापरण्यास सुरूवात केली आहे. या पॅटर्ननुसारच आता महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत व्हायरस प्रादुर्भावाचे जास्त रुग्ण असलेले काही भाग पूर्णपणे सिल करण्यास सुरूवात केली आहे. क्लस्टर कंटेनमेंट म्हणजे संक्रमित रुग्णाचा रहिवासी भाग सील करण्यासाठी धोरण राबविण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. या धोरणाचे सकारात्मक परिणाम विशेषत: आग्रा, गौतमबुद्ध नगर, पथानमतिट्टा, भिलवाडा आणि पूर्व दिल्ली येथे दिसत आहेत. मुंबई आणि इतर जिल्ह्यातही कंटेंनमेंट धोरण आणि कृती आराखड्यानुसार कारवाई केली जात आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…