ऑटीझम असलेल्या मुलाला उंटाच्या दुधाची गरज असल्याचे ट्विट एका मातेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आणि रेल्वेने २० किलोमीटर दूध त्या महिलेसाठी पोहोचविले. त्यासाठी रेल्वेच्या अधिकार्यांनी खास प्रयत्न केले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऑटीझम असलेल्या मुलाला उंटाच्या दुधाची गरज असल्याचे ट्विट एका मातेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आणि रेल्वेने २० किलोमीटर दूध त्या महिलेसाठी पोहोचविले. त्यासाठी रेल्वेच्या अधिकार्यांनी खास प्रयत्न केले.
मुंबईमध्ये राहणार्या रेणु कुमारी यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलाला ऑटीझम आहे. त्याला शेळी, गाय किंवा म्हशीच्या दुधाची अॅलर्जी आहे. या दुधात असे काही प्रोटीन असतात की ते पचत नाहीत. उंटाचे दूध मात्र त्यांच्यासाठी चांगले असते. मात्र, लॉकडाऊनमुळे उंटाचे दूध उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे रेणु कुमारी यांनी पंतप्रधानांना ट्विट केले.
Macro vision … micro actions …#IndiaFightsCarona pic.twitter.com/LRLftxi8YC
— B L Santhosh (@blsanthosh) April 11, 2020
त्यांनी लिहिले की माझा मुलगा साडेतीन वर्षांचा असून त्याला ऑटीझम असून अॅलर्जीचाही त्रास आहे. उंटाचे दूध आणि मर्यादित प्रमाणात डाळी हाच त्याचा आहार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे उंटाचे दूध मिळत नाही. राजस्थानातील सदरी येथून उंटाचे दूध किंवा त्याची पावडर मिळवून देण्यासाठी मला मदत करा. या ट्विटनंतर रेल्वेची यंत्रणा कामाला लागली. सदरी गावात थांबा नसूनही एक रेल्वे तेथे थांबविण्यात आली. तेथून २० लिटर दुधाचे कॅन घेऊन ते मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण बोहरा यांच्याकडे पाठविण्यात आल. त्यांनी ते रेणु कुमारी यांच्याकडे पाठविले. त्यांनीही गरजेपुरतेच दूध घेऊन बाकीचे इतर गरजुंसाठी दिले.