• Download App
    नौदलच्या मुंबई डॉकयार्डने निर्माण केली अत्यल्प खर्चातली 'टेंप्रेचर गन' | The Focus India

    नौदलच्या मुंबई डॉकयार्डने निर्माण केली अत्यल्प खर्चातली ‘टेंप्रेचर गन’

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नौदल डॉकयार्डने फक्त हजार रुपयांपेक्षाही कमी खर्चात शरीराचे तापमान मोजणारी ‘टेंप्रेचर गन’ तयार केली आहे. बाजारात विकत मिळणार्या तापमापकाइतकीच उपयुक्त पण त्यापेक्षा खूप स्वस्त असे याचे वैशिष्ट्य आहे.

    नौदल डॉकयार्डमध्ये दररोज वीस हजार लोकांची ये-जा होते. सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे, तब्बल 285 वर्षे जुन्या असणार्या मुंबईच्या या नौदल डॉकयार्डमध्ये (एनडी) खबरदारी घेतली जात आहे. आत येणार्या प्रत्येकाचे स्क्रीनिंग केले जात असून त्यासाठी शरीराचे तापमान मोजणे महत्वाचे आहे.

    कोरोनाच्या उद्रेकामुळे, नॉन-कॉर्डिटर थर्मामीटर किंवा तापमान गन बाजारात दुर्मिळ झाल्या आहेत. शिवाय काही उपकरणे खूप महाग विकली जातात. त्यामुळे नौदल डॉकयार्डने 0.02 डिग्री सेल्सियसच्या अचूकतेसह स्वतः सेंसर डिझाइन केले. या नॉन-कॉस्ट-थॉममीटरमध्ये एक इन्फ्रारेड सेन्सर आणि एक एलईडी स्क्रीन, एक मायक्रो-कंट्रोलर आहे जे 9 वी बॅटरीवर चालते. या ‘टेंप्रेचर गन’ने प्रवेशद्वारात प्रत्येकाचे स्क्रीनिंग केले जात आहे.

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Vote chori : राहुल गांधींचा “हायड्रोजन बॉम्ब” आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!!

    Modi @75 : रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!