मला एक कळलं नाही.. जितके सरकारी गेस्ट हाऊस काँग्रेसच्या काळात बनले त्या रूम ना मागून एक दरवाजा का असतो??? काँग्रेस एनसीपीवाल्यांच्या गेस्ट हाउस/सर्किट हाऊस चे किस्से कळले तर महाराष्ट्राला यांची पातळी कळेल, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधण्याचे नीलेश राणे यांनी सुरूच ठेवले आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मला एक कळलं नाही.. जितके सरकारी गेस्ट हाऊस ठउढ काँग्रेसच्या काळात बनले त्या रूम ना मागून एक दरवाजा का असतो??? काँग्रेस एनसीपीवाल्यांच्या गेस्ट हाउस/सर्किट हाऊसचे किस्से कळले तर महाराष्ट्राला यांची पातळी कळेल, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका केली आहे. तृतियापंथीयांचा उल्लेख करून त्यांनी केलेल्या ट्विटवरून राजकारण सुरू झाले आहे. मात्र, तरीही त्यांनी आपले ट्विटर बाण सोडणे थांबविले नाही. मी जर तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही. पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नव्हता.
एनसीपीवाल्यांना मी फाट्यावर मारतच राहणार. जितक्या केसेस घालायचे आहेत माझ्यावर तितक्या घाला पण इतिहास नोंद ठेवेल की एका निलेश राणेला एनसीपी पक्षातले सगळे पुरुष मिळून काही करू शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातही ट्विटरवर शाब्दिक युद्ध रंगले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पॅकेजची मागणी केल्यानंतर निलेश राणेंनी टीका करणारे ट्विट केलं होतं. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले होते. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी त्यात उडी घेतली होती. यानंतर निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती.