विशेष प्रतिनिधी
नाशिक : शहरातील उद्योजक संघटनांच्या मागणीतून नाशिक शहर आणि मालेगाव सोडून अन्य जिल्ह्याला रेडझोनमधून काढून ऑरेंजझोनमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. पण आज कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले पाचजण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने नाशिक पुन्हा रेडझोनमध्ये जाते काय अशी शंका निर्माण होत आहे. नव्याने सापडलेले कोरोना पॉझिटिव्ह अंबड या उद्योग परिसरातील आहेत, असे सांगितले जाते.
नाशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये दि.१७ करोना बाधित रुग्णाचा संपर्कात आलेल्या नागरिकांना डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथे भरती करण्यात आलेले होते व त्यांचे नमुने तपासणी करता पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल आलेला असून ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर इतर ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
संजीवनगर भागातील महिलेचे संपर्कात आलेल्या एकूण १५ व्यक्तींचे सॅम्पल तपासणी करता पाठवलेले होते. यापैकी २ व्यक्तींचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. समाजकल्याण विभागाच्या सेंटर मधील वास्तव्यास असलेल्या करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील एकूण १२ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवलेले होते. त्यापैकी ९ रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असून ३ अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे नाशिकच्या नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.