- साईनाथ लिंगाडे असे आरोपीचे नाव
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड येथील साधूंच्या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. साईनाथ लिंगाडे असे या आरोपीचे नाव आहे. नांदेड येथील मठात घुसून बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या केली. त्यांच्या एका सहकाऱ्याचीही हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता पोलिसांनी साईनाथ लिंगाडे याला तेलंगणातून अटक केली आहे.
लिंगाडे हा हत्या केल्यानंतर तेलंगणात पळून गेला होता. तो तानूर गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली.
काय घडले?
नांदेडमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला. उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून राज्याच्या गृह खात्याच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येनंतर साईनाथ लिंगाडे हा तेलंगणाला पळून गेला होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला. साईनाथ लिंगाडे तेलंगणच्या तानूर या गावात लपून बसला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर तेलंगण पोलिसांनी त्याला अटक केली.