कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलाखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा जामीन सर्वोच न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ‘शहरी नक्षलवाद’ या शब्दाला आक्षेप घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे चपराक बसल्याचे मानले जात आहे.
प्रतिनिधी
पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी कथित सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलाखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा जमीन सर्वोच न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
शनिवारवाड्यावर झालेली एल्गार परिषद आणि दुसर्या दिवशी कोरेगाव-भीमातून उसळलेल्या दंगल प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय तपास संस्था’ (‘एनआयए)’कडे सोपवली. केंद्राने ‘एनआयए’कडे तपासाची सूत्रे दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर आक्षेप घेत मोदी सरकारवर टीका केली. “सत्य बाहेर येण्याची भीती असल्यानेच केंद्र सरकारने हा तपास ‘एनआयए’कडे सुपूर्द केला. समाजातील अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे नक्षलवाद नाही,” असे म्हणत शरद पवारांनी ‘शहरी नक्षलवाद’ शब्दाच्या वापरालाही विरोध केला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे पवारांच्या भूमिकेला चपराक बसली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांवर नक्षलवादाचा आरोप करणाऱ्या पोलीस आयुक्त यांना आपण निलंबित केले असते असे म्हणत पोलिसांच्या चौकशीची मागणी केली होती. राज्यातील मागील देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्ष सरकारला संशयाच्या घेऱ्यात उभे केले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळून लावल्याने पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात तरी तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे.