मशीदीत नमाज करणार्यांवरच नव्हे तर त्याची परवानगी देणार्या इमामांनाही तुरुंगात टाका अशी मागणी अभिनेता कमाल खान याने केली आहे. मशीदीत नमाजासाठी काही जण जमा झाल्याचे वृत्त आल्यावर त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मशीदीत नमाज करणार्यांवरच नव्हे तर त्याची परवानगी देणार्या इमामांनाही तुरुंगात टाका अशी मागणी अभिनेता कमाल खान याने केली आहे. मशीदीत नमाजासाठी काही जण जमा झाल्याचे वृत्त आल्यावर त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.
लॉकडाऊन असताना पुण्यातील रविवार पेठेतील मशीदीत नमाज पढण्यासाठी जमा झालेल्य १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील छिंदवाड्यातही ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नमाजासाठी एकत्र येणार्यांवर कमाल खान चांगलाच भडकला आहे. ट्विटरवरून त्याने इमामांना धारेवर धरले आहे.
चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा असे आवाहन सरकार सातत्याने करत आहेत. सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही अनेक ठिकाणी मशीदीत नमाज पढण्यासाठी लोक जमा होत आहेत. यावर कमाल खान म्हणाला, ज्या इमामांनी नागरिकांना नमाज अदा करण्यासाठी कायदा मोडून मशिदीत येण्याची परवानगी दिली त्यांना तुरुंगात टाकावं. धर्माच्या नावाखाली कुणालाही कायदा मोडण्याचा अधिकार नाही.